समर्थ रामदासांचे व्यवस्थापन लेखक – सुनील चिंचोलकर.“जय जय रघुवीर समर्थ” लहानपणी एक शिरस्ता होता. शुभमं करोती व दररोज मनाचे श्लोक म्हणायचे. तेंव्हा फक्त म्हणत होतो न अर्थ समजता. पण ही छोटी पुस्तिका वाचली आणि मनाच्या श्लोकाचा अर्थ नव्याने समजला. एक एक पानावर एक व्यवस्थापनेचे उदाहरण दिल्याने वाचायला खुप छान आहे .• भगवान कृष्ण भारतीय व्यवस्थापनेचा जनक असे म्हंटले आहे. कारण जीवन पद्धतीतील कर्म कौशल्याला महत्त्व दिले. योग:कर्मसु कौशलम् • स्वातंत्र्यवीर सावरकरांना इटलीतील रामदास म्हंटले आहे.• स्वतःला बदलण्यासाठी अवगुणांचा त्याग करून सदगुणांची जोपासना केली पाहिजे.• प्रशिक्षणाद्वारे माणसे तयार करणे. उद्धव, वेणाबाई, अक्काबाई,दिवाकर गिरीधर, दिनकर हे लोक समर्थांनी तयार केले व यांनी पुन्हा जागोजागी मठ स्थापन करून समर्थांचे कार्य वाढविले.• श्रवण म्हणजे स्वतःला घडविण्याची साधना आहे.• आत्मपरीक्षणाद्वारे चुकांची दुरुस्ती करावी.• प्रयत्नांच्या साहाय्याने माणसाला हातावरच्या रेषा सुद्धा बदलता येतात.• समर्थ रोज पहाटे दोन तास सूर्यनमस्कार,सहा तास जप आणि ध्यान आणि भोजन विश्रांती नंतर विविध ग्रंथांचा अभ्यास करत. मन, मनगट, मेंदू यांच्या संतुलनासाठी.• समर्थांनी 15 व्या वर्षी 24 हजार श्लोकांचे वाल्मीकि रामायण लिहून काढले.दिसामाजी काहीतरी लिहावे.• कुणालाही आपले हस्ताक्षर वाचता यावे असे नीटनेटके असावे.• ग्रंथसंपदा प्राणापलीकडे जपून ठेवा.• भोजनाचे, स्वयंपाकाचे, वेळेचे, 24 तासांचे,मंदिराचे व्यवस्थापन असावे.• अखंड सावधान असावे. शिवाजी महाराज, माल्थसचा सिद्धांत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर, सामान्य जनता, राजकारण, धर्मकारण अशी अनेक उदाहरणं स्पष्टीकरणा सहित दिल्याने समजायला सोपं आणि अत्यंत उपयुक्त अशी ही छोटी पुस्तिका सर्वांना वाचनीय अशीच आहे. सुलभा तांबडे.