
अवघ्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेण्यामागे काय दुःख, निराशा असावी? तसं पाहिलं तर या बेगडी दुनियेतील ही काही पहिली आत्महत्या नाही. तरीही या बातमीने मन हेलकावलं. छोटया पडद्यावरून मोठया पडद्यावर तेही यशस्वी पदार्पण. मी त्याचे धोनी व पीके हे चित्रपट पहिले होते मला तर या दोन्हीही चित्रपटातील व्यक्तिरेखा मनाला भावल्या असल्यामुळे त्याच्या “या “बातमीने त्याच्या व्यक्तीरेखा डोळ्यसमोरून तरळल्या आणि सहजच मनात प्रश्न आला या हसऱ्या चेहऱ्या मागे इतकं मोठं काय दुःख असावं कि त्यानं जगाचा निरोप घ्यावा?
लखलखत्या, आभासी दुनियेत मन मोकळं करता येईल असे मित्र -मैत्रीणी नसतील का ? पैसा प्रसिद्धी असूनही तिथे एकटेपणा असतो का? “छीछोरे “सारख्या चित्रपटातून ‘खुदखुसी करना कोई हल नहीं ‘ असं सांगणाऱ्या सुशांतला स्वतःच्या नैराश्येवर उपाय सापडला नाही का? भूमिका साकारली, संदेश इतरांना दिला पण आत्मसात का करता आला नाही? सुशांतच्या वडिलांना पुत्रशोक पेलण्याचं बळ येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
🙏
